सुरज सावंत
मुंबई - एनआयएने NIA प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या मुंबईतील Mumbai अंधेरी परिसरातील घरावर छापा टाकला आहे. आता शर्मा यांच्या घरातून एनआयएने मनसुख Mansukh Hiren हिरेन हत्या व अँटिलिया स्फोटक प्रकरणी महत्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत.Pradip Sharma May be arrested soon By NIA
या पुराव्यांमध्ये काही इलक्ट्रॉनिक वस्तू, सॉफ्टवेअर, कागद पत्रे आणि शर्मा सध्या वापरत असलेला मोबाईल याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तब्बल आठ तासांहून अधिक वेळ हे सर्च ऑपरेशन सुरू होते. स्वत: एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्च ऑपरेशन सुरू होते.
सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या दरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. सीआरपीएफच्या ८ ते १० कंपन्या प्रदीप शर्मा यांच्या घराजवळ तैनात होत्या. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत.Pradip Sharma will be arrested soon
हे देखील पहा -
आज सकाळी सहाएनआयए कडून प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा याच्या घरी एनआयएने कारवाई करत छापा टाकला. या प्रकरणात या पूर्वी शर्मा यांची सलग दोन दिवस चौकशी झाली होती. त्यावेळी शर्मा यांचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आले होते असे सूत्रांनी सांगितले आहे. Pradip Sharma May be arrested soon by NIA
या प्रकरणात काही दिवसांपूर्वी एनआयएने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली आहे. संतोष हा शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाजे यांची अंधेरीत मिटिंग झाल्याचे बोलले जात आह. त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.