pradhan mantri pik vima yojana  saam tv
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत वाढवली, या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार

pradhan mantri pik vima yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे. १० ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक वीमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nandkumar Joshi

सागर आव्हाड, साम टीव्ही | पुणे

राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ वरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली.

राज्यातील आठ कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार, कोकण विभागातून १,०२,३३५, नाशिक विभागातून ३,३३,३८५, पुणे विभागातून ६,०७,६६३, कोल्हापूर विभागातून २,४०,२५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३,२५,०००, लातूर विभागातून २,४२,८२६, अमरावती विभागातून ६,९१,९७३ आणि नागपूर विभागातून ४,५३,३८३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.

एकूण ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. मराठवाडा विभागातून सर्वाधिक, तर कोकण विभागातून सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.

पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उलटला

Sunetra Pawar : जनाची तरी लाज बाळगा; सुनेत्रा पवारांवर टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर शिंदे कडाडले

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत मोठी घडामोड! शरद पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त

Crime: ३२ सेकंदात ३४ वेळा चाकूने वार, शिक्षिकेची शाळेबाहेर हत्या; थरकाप उडवणारा VIDEO समोर

KDMC Hospital: अडीच वर्षाच्या मुलाला इंजेक्शन देताना कमरेत अडकली सुई; रुक्मिणीबाई रुग्णालयाचा निष्काळजीपणा

SCROLL FOR NEXT