कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल अरुण जोशी
महाराष्ट्र

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

अरुण जोशी

अमरावती : कोरोना सोबत लढताना करत असताना कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, ढगफुटी व दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात विज वितरण कंपनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल.

हे देखील पहा -

तसेच आता अंडरग्राऊंड पद्धतीने वीज वाहिन्या टाकून वीजपुरवठा करणार अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. रविवारी संध्याकाळी अमरावती दौऱ्यावर आले असतांना विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांंशी संवाद साधला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी 3800 कोटी रुपये अंडरग्राऊंड विजेसाठी जाहीर केले आहेत. त्यामुळे आता नव्याने काम करावे लागेल असेही ते म्हणाले. पूरामुळे विजवितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

येणाऱ्या काळात आता असे नुकसान होणार नाही याचीही काळजी घेण्यात येणार आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पश्चिम बंगाल मधून कर्मचारी मागवले आहेत. मंगळवारी महाड येथील दौरा करून नुकसानीची पाहणी करणार आहे, तसेच इतर भागाचा दौरा कॅबिनेट बैठकीनंतर करू असेही त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT