Kirit Somaiya Saam TV
महाराष्ट्र

Kirit Somaiya: किरीट सोमय्या हरवल्याचे ठाणे, उस्मानाबादेत झळकले पोस्टर्स

सोमय्या पिता-पुत्र गायब असल्याने उस्मानाबाद शहरात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे 'मोस्ट वॉन्टेड, फरार मोस्ट वॉन्टेड'; म्हणुन पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी -

उस्मानाबाद : INS विक्रांत (INS Vikrant) युद्धनौकेच्या डागडुजीसाठी गोळा केलेला निधी राज्यपाल भवनाकडे जमा न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी पोलिसांनी समन्स बाजवली आहे. तसंच या दोघांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला असून तेंव्हापासून हे पिता-पुत्र गायब असल्याने उस्मानाबाद शहरात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे 'मोस्ट वॉन्टेड, फरार मोस्ट वॉन्टेड'; म्हणुन पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

विक्रांत निधी घोटाळ्यातील फरार आरोपी म्हणून मोस्ट वॉन्टेड फरार आरोपी भाजपा खासदार किरीट सोमय्या असा उल्लेख या पोस्टवर करण्यात आलाय. तसंच फरार आरोपी किरीट सोमय्या यांना शोधुन आणेल त्याला योग्य बक्षीस दिल जाईल. देशप्रेमी संघटना धाराशिव या नावाने शहरात हे पोस्टर लावण्यात आले आहेत. जिल्हा परिषद परीसरात हे पोस्टर लावण्यात आले असुन लावलेले हे पोस्टर कर्मचाऱ्यांना काढायला लावलेत.

ठाण्यातही झळकलेत सोमय्या हरवल्याची पोस्टर -

हे देखील पहा -

ठाण्यातील (Thane) तीन हाथ नाका येथे भाजप नेते किरीट सोमय्या हरवले आहेत. किरीट सोमय्या देशद्रोही आहेत. त्यांचाी माहिती देणाऱ्यास बक्षीस दिल जाईल तसेच त्याचा सत्कार देखील करण्यात येईल. अशा आशयाचा एक बॅनर ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते तुषार रसाळ यांनी संजय राऊत फॅन्स क्लब च्या माध्यमातून लावला आहे. किरीट आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या हे मागील काही दिवसापासून गायब आहेत. आर्थिक घोटाळ्यात जामिनासाठी त्यांची लढाई सुरू असतानाच सदरचा बॅनर लावण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT