Amravati: दोन महिन्यांपुर्वी सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता
Amravati: दोन महिन्यांपुर्वी सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता Saam TV
महाराष्ट्र

Amravati: दोन महिन्यांपुर्वी सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता

अरुण जोशी

अमरावती : अमरावती जिल्ह्यात रोज नव्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली असून कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद कराव्या असा प्रस्ताव नवनियुक्त महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Municipal Commissioner Praveen Ashtikar) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे .त्यामुळे आता लवकरच महापालिकेच्या शाळा बंद होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या ही अमरावती (Amravati) जिल्ह्यात पूर्णपणे आटोक्यात होती त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मनपा शाळा ,खाजगी शाळा ह्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या होत्या मात्र दोन दिवसांपासून कोरोनाचा (Corona) जिल्ह्यात पुन्हा उद्रेक होऊ लागल्याने महापालिका शाळा (School) बंद करण्याचा अहवाल मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठविला आहे. सध्या जिल्ह्यात कोणत्याही विध्यार्थी हा कोरोना बाधित नसला तरी कोरोना च्या प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढत असल्या कारणाने हा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठविण्यात आला आहे आता यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT