Amit Shah- Shinde - Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Cabinet Reshuffle: राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार? तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता, कोण आहेत ते मंत्री?

मात्र तीन मंत्र्यांच्या कामावर अमित शाह नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे-फडवणवीस सरकारला सत्ता स्थापन करुन सात महिने होणार आहेत. सत्ता स्थापनेपासूनच शिंदे-फडणवीस सरकारवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं बारीक लक्ष आहे. राज्यातील मंत्र्यांच्या कामाचा आढावा ते सातत्याने घेत होते. मात्र तीन मंत्र्यांच्या कामावर अमित शाह नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या मंत्र्यांना मंत्रिपदाला मुकावं लागू शकतं.  (Latest Marathi News)

गृहमंत्रालयाची सूत्रं, मतदारसंघातून मिळणारी माहिती आणि पक्षातील यंत्रणेकडून मिळणारी माहिती याआधारे अमित शाह याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तीन मंत्र्यांच्या काही तक्रारी अमित शाह यांच्यापर्यंत गेल्या होत्या.

अमित शाहांनी त्याआधारे त्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवर अमित शाह यांचं समाधान होते की नाही? यावर या तीन मंत्र्यांचं मंत्रिपद अवलंबून आहे. मात्र हे तीन मंत्री कोण आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Bhojan : शिवभोजन योजनेबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नवीन GR जारी, आताच जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: अमरावती मधील विदर्भाचा राजा गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक रॅलीला सुरुवात.

Ghee : तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? ६०% लोकांना माहितच नाही, आताच घ्या समजून

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

SCROLL FOR NEXT