Pooja Tadas saam Digital
महाराष्ट्र

Pooja Tadas : पूजा तडस यांचे तडस कुटुंबावर गंभीर आरोप; पंतप्रधानांनी लक्ष घालण्याचं आवाहन

Sandeep Gawade

Pooja Tadas

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबावर गंभीर आरोप केलेत. लोखंडी रॉडने मारहाण केली, बाळ कुणाचं असं विचारून मला DNA टेस्ट करायला सांगितली. चारित्र्यावर संशय घेतल्याचे आरोप पूजा तडस यांनी केलेत. 20 एप्रिलला पंतप्रधान मोदींची रामदास तडस यांच्यासाठी वर्ध्यामध्ये सभा होण्याची शक्यता आहे. यासभेपूर्वी नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा आहे, नरेंद्र मोदींनी मला न्याय द्यावा, अशी विनंती पूजा यांनी केली आहे.

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पुजा तडस यांनी तडस कुटुंबावर गंभीर आरोप केलेत..तडस यांच्या सुनेने लोखंडी रोडने मारहाण झाल्याचे गंभीर आरोप केलेत.. शिवाय बाळ कुणाचं असं विचारुन मला DNA टेस्ट करायला सांगितल्याचंही म्हटलंय. पूजा तडस यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर वर्ध्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. दरम्यान 2020 पासून आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवल जातंय असा पलटवार पंकज तडस यांनी पत्नीवर केलाय. तर हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा रामदास तडस यांनी केलाय.

काय आहे प्रकरण?

2020 मध्ये खासदार रामदास तडस यांच्या मुलावर शारीरिक छळ आणि लैंगिक शोषणाचे आरोप पूजा तडस यांनी केले होते. पूजा तडस यांच्याकडून तडस कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती. लग्नाचं आमिष देऊन पंकज तडस यांनी फसवणूक केल्याचा पूजा तडस यांचा आरोप होता. पूजा तडस यांनी आरोप केल्यानंतर पंकज तडस आणि पूजा यांचं लग्न झालं. लग्नानंतर तडस कुटुंबाने मारझोड करून घरातून बाहेर काढल्याचा आरोप पूजा तडस यांनी केलाय.तर पूजा तडस यांचा आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचं रामदास तडस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पूजा तडस यांनी पंतप्रधान मोदींना न्याय मिळवून देण्याची आर्त हाक दिलीय.आता मोदींच्या वर्धा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पूजा तडस आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT