Ramraje Naik Nimbalkar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: "चिलटं, डास येतच असतात, ढेकूण चावतोच..त्यांच्याकडे फार लक्ष देत नाही"; निंबाळकरांकडून अजित दादांच्या आमदाराचा समाचार

Ramraje Nimbalkar Fires Back at Sachin Patils Criticism: "त्यांचा जन्मही झाला नव्हता, जेव्हा मी या भागासाठी काम करत होतो" – रामराजे नाईक निंबाळकर यांचा आमदार सचिन पाटील यांना जोरदार टोला.

Bhagyashree Kamble

काही दिवसांपूर्वी फलटण विधानसभेचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी भरसभेत सणसणीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

"मी या भागासाठी काय काम केलंय, हे विचारण्याआधी त्यांचा जन्म तरी झाला होता का?" असा सवाल करत निंबाळकर यांनी सचिन पाटलांवर हल्लाबोल केला. तसेच "चिलटं, डास चावतच असतात. त्यांच्यावर मी फार लक्ष देत नाही. त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे, स्वत:ला कमी लेखणं", असं म्हणत निंबाळकरांनी पाटलांनी केलेल्या टीकेला दुर्लक्षित केलं.

आमदारंच्या टीकेला दुर्लक्षित

"मी या भागासाठी काय केलं, हे विचारण्याआधी, त्यांचा जन्म तरी झाला होता का? मी काय केलं हे त्यांच्या वडिलांना नक्कीच माहित आहे. कारण ते आमच्या घराशी संबंधित होते", असं रामराजे म्हणालेत.

तसेच सचिन पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना निंबाळकर म्हणाले, "चिलटं, डास, ढेकूण चावत असतात. त्यांच्यावर मी फार लक्ष देत नाही. त्यांच्या विषयी बोलणं म्हणजे, स्वत:ला कमी लेखणं", अशा शब्दात त्यांनी आमदारंच्या टीकेला दुर्लक्षित केलं.

"कृष्णा महामंडळ काय आहे, त्याला काय त्याच्या नेत्याला देखील माहित नाही. तो एक पाळीव पोपट आहे. मालक जे बोलतो जे शिकवतो ते इथं येऊन तो बोलतो. त्यांना जर या भागाचे कल्याण करायचे असेल तर, म्हसवडची एमआयडीसी या भागात आणून दाखवावी आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू", असं ठाम आव्हान रामराजेंनी सभेत दिलं. रामराजेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT