Prashant Kishor Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर देणार विदर्भ चळवळीला गती; आंदोलनाची रणनीती ठरविणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आता राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची मदत घेतली जाणार आहे. २८ सप्टेंबरला प्रशांत किशोर नागपुरात (Nagpur) येणार असून विदर्भातील नेत्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर स्वतंत्र विदर्भाबाबत (Vidarbha) भुमिका जाहिर करणार केली जाणार आहे.

हे देखील पाहा -

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या निमंत्रणावरुन प्रशांत किशोर नागपुरात येत आहेत. येत्या २८ सप्टेंबरला नागपूर कराराला ७० वर्षे सुरु होत आहे. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा हुंकार केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणी साठी आंदोलन केलं जात आहे. मात्र, नेते मागणी मान्य होत नाही आहे, उलट हे आंदोलन आता कमजोर पडलं आहे. त्यामुळं या आंदोलनाला पुन्हा गती देण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाणार आहे.

भाजपने स्वतंत्र विदर्भाची भुमिका सोडल्यामुळे ही चळवळ मागे पडली आहे, आता स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला गती दिली जाणार असल्याचं काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सांगितलं. प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीमुळं दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यात त्या त्या पक्षांना मदत झाली. त्यामुळं विदर्भाच्या आंदोलनाला आता प्रशांत किशोर उभारी देतील का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT