Raju khare  Saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार पडेल; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

raju khare statement on devendra fadnavis : एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले तर फडणवीसांचं सरकार कोसळेल असा दावा आमदार राजू खरे यांनी दावा केलाय. राजू खरे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

निवडणुकीचा प्रचार शिगेला

निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान राजू खरे यांचं मोठं वक्तव्य

राजू खरे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मोहोळचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले तर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडेल, असं राजकीय विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे‌.

राज्यभरात महानगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील विविध भागात पक्षातील उमेदवारांच्या प्रचारात व्यग्र आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान राज्याच्या राजकारणावर राजू खरे यांनी मोठं भाष्य केलंय. राजू खरेंच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

राजू खरे नेमकं काय म्हणाले?

सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत. यात महायुतीतील घटकपक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वच काही आलबेल आहे, असं वातावरण नाही. महायुतीमधील नेतेच एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत.

याचदरम्यान मोहोळचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एका कार्यक्रमात फडणवीस सरकार पडेल, असं वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदेंकडे साठी आणि अजित पवारांकडे ४२ आमदार आहेत आणि इतर अपक्ष सोबत आले. त्यानंतर हे सगळे सरकारमधून बाहेर पडले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील का? सरकार पडले ना.., असे म्हणत आमदार खरे यांनी खळबळ उडवून दिली आहे. राजू खरे यांच्या वक्तव्यावर महायुतीचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कालच्या राड्यानंतर इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेत वाढ

Indian Oil Jobs: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

Anil Agarwal Son Dies: आयुष्यात यापेक्षा वाईट काय असू शकते? प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या मुलाचा मृत्यू; भावनिक पोस्ट चर्चेत

Body Shaping Tips: शरीराचा आकार बिघडलाय? काळजी करू नका, घरीच करा हे 5 सोपे उपाय

Accident : नंदुरबारमध्ये आयशर टेम्पो आणि ट्रकची भीषण धडक, रक्ताच्या थारोळ्यात पडललेल्या जखमींना देवदूतचा हात

SCROLL FOR NEXT