Sanjay Raut vs Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut On Ajit Pawar: 'धरणात #$##पेक्षा' थुंकणे कधीही बरे; अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांचं रोखठोक उत्तर

Sanjay Raut On Ajit Pawar: भाजपसह आणि शिंदे गटासह अजित पवारांनी देखील राऊतांच्या या कृत्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राऊतांनी इतकं

Ruchika Jadhav

Sanjay Raut Spit: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काल पत्रकारपरिषदेत श्रीकांत शिंदे यांच्या विषयी प्रश्न विचारल्यावर राऊत त्यांच्या नावावर थुंकले. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून राऊतांवर सडकून टीका होत आहे. (Political News)

भाजप आणि शिंदे गटासह अजित पवारांनी देखील राऊतांच्या या कृत्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राऊतांनी इतकं आक्रमक न होता संयम ठेवला पाहिजे, असं विधान अजित पवारांंनी केलं होतं. अजित पवारांच्या या टीकेला आता राऊतांनी पुन्हा एकदा सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत आज नाशिक (Nahik) दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, "ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगत आहोत आणि भोगूनही आम्ही कुठे पळालो नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे. तसेच अजित पवार भाजपात जाणार अशा सुरु असलेल्या चर्चांची आठवन करुन देत राऊत म्हणाले की, "मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. माझ्या मनात पक्ष बदलण्याचा विचार येत नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे.

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) थुंकण्याच्या कृत्यामुळे आज पुण्यात त्यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात येणर आहे. तसेच राऊतांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. मात्र आपल्याला कोणाच्याही सुरक्षिततेची आवश्यकता नाही. मी वन मॅन आर्मी आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमधील शेतकरी आंदोलनावर आज तोडगा निघणार, बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, फक्त याच महिलांना मिळणार ₹१५००

Recharge Offer: फक्त ₹239 मध्ये दररोज 1.5GB डेटा, जाणून घ्या 'या' बजेट प्लॅनची वैधता अन् फायदे

BMC Election: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम, आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

PM Ujjawala Yojana: खुशखबर! मोफत LPG गॅस मिळणार; कुठे अन् कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT