Sanjay Raut Tweet saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: मोदी-शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील...; कर्नाटक निवडणुकांवरुन संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

Karnataka Election: अशात खासदार संजय राऊतांनी कर्नाटक निवडणुकीवरुन भाजपवर टीकास्त्र सोडलं असून शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Political News: कर्नाटकात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. सकळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. तसेच १३ मे रोजी मतमोजणी होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशात खासदार संजय राऊतांनी कर्नाटक निवडणुकीवरुन भाजपवर टीकास्त्र सोडलं असून शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. (Political News)

संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, "आज कर्नाटक राज्यात विधान सभा निवडणुका होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे, असं टीकास्त्र राऊतांनी भाजपवर सोडलं आहे.

2024 साठी शुभशकुन

कर्नाटक विधानसभा निवडणुक ही 2024 साठी शुभशकुन असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. तसेच पुढे शिंदे गटाच्या नेत्यांवर आरोप करत त्यांनी म्हटलं की, "दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली."

"स्वतःला शिवसेना म्हवणून घेणारे मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली. महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे. मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील.", असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

SCROLL FOR NEXT