Political News Saam TV
महाराष्ट्र

Political News : अजित पवार ४० आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडणार; शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा

अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला नाहितर अख्खा राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता, असं विधान आमदार महेश शिंदे यांनी केलं आहे.

ओंकार कदम

Mahesh Shinde : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचलंल याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशात अजित पवारांमुळे त्यांनी असं केलं असावं? असा प्रश्न सामनाच्या आजच्या अग्रलेखात करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Political News)

राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता

कोरेगाव येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. या वेळी पत्रकारांशी बोलत असताना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच शरद पवार हुशार आहेत म्हणुनच त्यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला नाहितर अख्खा राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता, असं विधान आमदार महेश शिंदे यांनी केलं आहे.

अजित पवार हे त्यांच्यासोबत राहणार नाहीत

पवारांनी हा निर्णय घेतला नसता तर काय झाले असते याबाबत सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, अजित पवार हे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले असते. मात्र शरद पवार यांनी किती ही प्रयत्न केले तरी थोड्या दिवसांत या गोष्टी होणारच आहेत. अजित पवार हे त्यांच्यासोबत राहणार नाहीत असा गौप्यस्फोट आमदार महेश शिंदे यांनी केलाय.

तर महाविकास आघाडीची वज्रमुठ कधी नव्हतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची वज्रमुठ गायब केली, अशी टीका देखील महेश शिंदेंनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

'शिवाजी कोण होता?'चं बनावट पुस्तक? पानसरेंच्या पुस्तकाचं परवानगीविना प्रकाशन?

SCROLL FOR NEXT