Sharad Pawar NCP splits SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीच्या घटकपक्षाचा प्रमुख शरद पवारांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय? चर्चेला उधाण

Sharad Pawar-Mahadev Jankar Meeting : महायुतीसोबत असलेला पक्ष महाविकास आघाडीसोबत येण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुनील काळे

Mumbai News :

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना राज्यात होणार आहे. महायुतीसोबत असलेला एक पक्ष महाविकास आघाडीसोबत येण्याची शक्यता आहे. दोन बड्या नेत्यांमधील भेटीमुळे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महायुतीसोबत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचं समोर येत आहे.

महादेव जानकर महायुतीत नाराज असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु होती. महायुतीची ताकद वाढल्यानंतर महादेव जानकर राजकारणात फारसे सक्रिय दिसत नव्हते. मात्र शरद पवार यांच्या सोबतच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Political News)

महादेव जानकार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकं काय झालं? जानकर महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीत सहभागी होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या काळात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

Papad Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? मग कुरकुरीत पापडापासून बनवा 'हा' पदार्थ

Friday Horoscope: शुक्रवारची सुरुवात धमाकेदार बातमीने होईल, हाती आलेला पैसा जाण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: राजभवनात 'मोदीज मिशन' पुस्तकाचं प्रकाशन

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT