Ramdas Athawale Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Athwale : रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय भाजपला पर्याय नाही : रामदास आठवले

Ramdas Athwale : मावळातील देहूरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जाहीर भाषणात बोलत होते.

दिलीप कांबळे

Buldhana News : रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय देशात आणि राज्यात भाजप आणि एनडीएला पर्याय नाही. रिपाइंशिवाय एकहाती सत्ता मिळवणे त्यांना सोपं नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. मावळातील देहूरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जाहीर भाषणात बोलत होते.

सत्ता मिळवल्याशिवाय गोरगरिबांची, लोकांची कामं करता येणार नाहीत,म्हणून सत्तेत राहणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण एकटे लढलो तर सत्ता मिळणे हे देखील अवघड असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रीपद मिळाले म्हणून काहींना वाईट वाटत आहे. ज्यांना वाईट वाटतंय त्यांना वाईट वाटू दे. आपण आपलं काम करत राहू, असंही आठवले यांनी म्हटले आहे. (Political News)

बाबासाहेबांचा निळा झेंडा माझ्या हातात आहे. मी कुठेही गेलो तरी निळा झेंडा घेऊन जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील निळा झेंडा मान्य आहे. रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय देशात आणि राज्यात सत्ता मिळणे कठीण आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष वेळोवेळी आपलं अस्तित्व टिकवून आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं. (Latest News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Transfers : राज्यात मोठा प्रशासनिक बदल! ४१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, २२४ निरीक्षकांना पदोन्नती

Maharashtra News Live Update: पुणे शहरात रात्रभर रिमझिम पावसाची हजेरी

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून सक्रीय! २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Mumbai Rains: दादार स्थानकात जिकडे तिकडे पाणीच पाणी; मुंबई, पालघरला 'रेड' अलर्ट, पुढचे ३ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

काळेभोर लांब केसांसाठी कढीपत्त्याचं तेल ठरेल फायदेशीर, केस गळतीही रोखेल

SCROLL FOR NEXT