Rohit Pawar News saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का; ४.५० लाखांचा दंड, काय आहे प्रकरण?

रोहित पवारांच्या बारामतीमधील अॅग्रो साखर कारखान्याला ४.५० लाखांचा दंड बसला आहे.

Ruchika Jadhav

Political News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रोहित पवार यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित पवारांच्या बारामतीमधील अॅग्रो साखर कारखान्याला ४.५० लाखांचा दंड बसला आहे. (Latets Marathi News)

काय आहे प्रकरण?

साखर कारखान्यांबाबात सरकारने गाळप हंगाम सुरू करण्यासाठी तारीख निश्चित केली होती. मात्र ही तारीख मोडून रोहित पवारांच्या कारखान्याने अधीच गाळप हंगाम सुरू केला. त्यामुळे अॅग्रो साखर कारखान्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते.

भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते.

त्यामुळे मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. सुभाष गुळवेंवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आता बारामती अॅग्रो साखर कारखान्याला ४.५० लाखांचा दंड बसला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT