Political News  Saam TV
महाराष्ट्र

Political News : शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग, सुप्रिया सुळेंचा कर्नाटक दौरा रद्द

अशात आज मुंबईत अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Ruchika Jadhav

NCP New Chief : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच गोंधळ सुरू झाला. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्तांनी आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. अशात आज मुंबईत अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. (Sharad Pawar)

शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यावर पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्वांमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे अशी दोन नावे समोर येत आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी आज राष्ट्रवादीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासह सुप्रिया सुळे यांनी आपला कर्नाटक दौरा रद्द केला आहे.

ठाकरे गटातही हलचालींना सुरूवात

शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर महाविकास आघाडातील सर्वच पक्षांत हलचालींना सुरूवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील आपले आजचे दौरे रद्द केले आहेत. यासह सुप्रिया सुळे यांच्या अध्यपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे.

छगन भुजबळ यांचे संकेत

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार आणि केंद्रात देशपातळीवरसुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यांचे लोकसभेत कामआहे. त्यामुळे त्या अध्यक्ष होण्यात अडचण नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

अनुभव कमी पडला तर शरद पवार आहेतच. शरद पवार यांनी निर्णय बदलला नाही तर निर्णय घ्यावा लागेल. शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT