Shinde pakshpravesh Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना दणका! बडा नेता गळाला लागला, इनकमिंग सुरूच

Maharashtra Politics: हिमाचल प्रदेशातील ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे. हिमाचल प्रदेशातील शिवसेना ठाकरे गटाचे राज्य प्रमुख नरेश कुमार संजीव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Bhagyashree Kamble

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय. अनेक पक्षातील नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. काही दिवसांपूर्वी भाजपचं शिर्डीत अधिवेशन पार पडलं. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रावादीचे देखील अधिवेशन सुरू आहे. दुसरीकडे शिंदे गटानेही मोट बांधायला सुरूवात केलीय. शिंदे गटातही जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा दणका दिलाय. ठाकरे गटातील मोठा नेता शिंदे गटाच्या गळाला लागलाय.

काही दिवसांपासून विविध पक्षांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केलाय. अशातच राज्यासोबत इतर राज्यातील पक्ष प्रवेश सुरू आहेत. यादरम्यान, हिमाचल प्रदेशातील ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे. हिमाचल प्रदेशातील शिवसेना ठाकरे गटाचे राज्य प्रमुख नरेश कुमार संजीव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

नरेश कुमार संजीव यांच्यासहित युवासेनेचे दिशाल संजीव यांनी देखील ठाकरे गटाला रामराम करत, शिंदे गटात प्रवेश केलाय. राजस्थानचे पक्षप्रमुख आमदार प्रवीण ठकराल आणि जम्मू काश्मीर उपराज्य प्रमुख मोहिंदर पाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी १८ डिसेंबरला प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय.

यावेळी नाशिक जिल्ह्यातील निफाड विधानसभा मतदारसंघ, दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार गटात पक्षप्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षातही इनकमिंग सुरू झालं आहे. राज्यभरातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. शिर्डी येथे अजित पवारांच्या हस्ते जम्बो पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, विविध जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT