Raju Shetti, swabhimani shetkari sanghatana saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti News: राजू शेट्टींची मोठी घोषणा! यापुढे 'स्वाभिमानी संघटनेत' राजकीय नेते अन् कार्यकर्त्याला नो एन्ट्री

Raju Shetti Announcement: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज संघटनात्मक दृष्ट्या मोठा निर्णय घेतला आहे.

भारत नागणे

Swabhimani Shetkari Sanghatana:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज संघटनात्मक दृष्ट्या मोठा निर्णय घेतला आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय राजू शेट्टी यांनी जाहीर केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उपस्थितीत आज पंढरपूर येथे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

सरकारने ठरवून दिलेल्या साखर विक्रीच्या किंमती पेक्षा साखर कारखान्यांना प्रती क्विंटल 500 रूपये अधिक मिळाले आहेत. शिवाय इथेनाॅलच्या खरेदी दरात चांगली वाढ झाली आहे. त्या हिशोबाने साखर कारखान्यांनी प्रति टन 400 रूपये देणे लागत आहे. ती थकीत रक्कम लवकर द्यावी अन्यथा साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा ही त्यांनी दिला.

नाशिकच्या (Nashik) कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. हा वाद व्यापारी आणि सरकारमध्ये होता. उशिराने का होईना पण त्यांना शहाणपण सुचले आहे. या पुढे कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले तर सरकारने त्यांचे परवाने रद्द करावे अशी मागणी ही शेट्टी यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT