Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane : "दिपक केसरकर हमारे साथ..." प्रचारसभेत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, कोकणातल्या राजकारणात खळबळ

Maharashtra Local Body Election : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात नितेश राणे यांनी “दीपक केसरकर आमच्या सोबत” असे विधान करत खळबळ उडवली. केसरकरांनीही प्रत्युत्तर देत स्पष्ट भूमिका मांडली.

Alisha Khedekar

  • नितेश राणे यांचे सभेत धडाकेबाज वक्तव्य

  • दीपक केसरकर यांनी दिले प्रत्युत्तर

  • कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले

  • मतदारांनी गैरसमज करून घेऊ नये असा सल्ला

राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कामांची लगबग सुरु आहे. अगदी काही दिवसांवर निवडणुका असल्याने नेते मंडळी लागोपाठ प्रचारसभा घेताना पाहायला मिळत आहेत. अशातच भाजपचे नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात मोठं वक्तव्य केलं आहे. 'अंदर कि ये बात है दिपक केसरकर हमारे साथ है' श्रद्धाताईंना मत म्हणजे दिपक केसरकर यांना मत अस म्हणतं भर सभेत नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना भाजपचे नेते तसेच पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "सावंतवाडी राजघराण्यातील भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार असलेल्या श्रद्धाराजे भोसले यांना दिपक केसरकर यांनी पक्ष बाजूला ठेवून आपली मुलगी समजून पाठींबा द्यायला हवा होता. मात्र ते विरोधात लढत असले तरी त्यांचा छुपा पाठींबा भाजपला आहे. 'अंदर कि ये बात है दिपक केसरकर हमारे साथ है' श्रद्धाताईंना मत म्हणजे दिपक केसरकर यांना मत. " असे वक्तव्य त्यांनी केले.

मात्र नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, "मी आजारी आहे त्यामुळे मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून दिशाभूल करण चुकीच आहे. कोणीही कितीही दिशाभूल केली तरी जनतेने फसू नये. मला जर मत द्यायचं असेल तर धनुष्यबाणाला मत द्या." असे आवाहन दीपक केसरकर यांनी नागरिकांना केलं आहे.

या आरोप प्रत्यारोपानंतर कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून महायुतीतल्या अंतर्गत वादाची आणखी चर्चा वाढली आहे. दरम्यान या निवडणुकीत कोणाच पारडं सर्वात जास्त मतांनी जड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT