मंगेश गाडे
जुन्नर : पावसाची Rain रिमझिम, धुक्याची दुलई, खळखळणारे ओढे- नाले, मनमोहक धबधबे Waterfalls, धरतीने पांघरलेली हिरवी शाल आणि याच्या जोडीला आल्हाददायक थंडी अनुभवण्यासाठी सध्या नाणेघाट Naneghat व दऱ्याघाटाकडे पर्यटकांचा tourists ओढा वाहू लागला आहे. Police Action again on crowds in Naneghat
दुचाकी, चारचाकी वाहनातून युवक तसेच, कौंटूंबिक सदस्य ठिकाणी सुट्टीच्या Holiday दिवशी सहलीसाठी येत आहेत. नाणेघाट वाहनांच्या व पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
हे देखील पहा-
कोरोना Corona अजून गेला नाही. लॉक डाऊन Lockdown कायम आहे. पर्यटन स्थळे बंद आहेत, यामुळे लोकहो पर्यटन व कौटुंबिक सहली थांबवा असे आवाहन पोलीस Police प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या शनिवार व रविवारी सहलीसाठी येथे पुणे Pune, ठाणे Thane जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. Police Action again on crowds in Naneghat
नाणेघाटात होणाऱ्या गर्दीवर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. यात नियम मोडणाऱ्या ८ दुकाने व विनाकारण फिरणाऱ्या ६२ जणांवर केलेल्या कारवाईत व्यक्तीकडून ३४ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई रोज अशीच सुरू राहणार असल्याचे, जुन्नर पोलीसांनी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.