चोरीच्या 12 गाड्यांसह 4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

चोरीच्या 12 गाड्यांसह 4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

चोरीच्या वाहनांसोबतच ती चोरणाऱ्यां आरोपींच्या मुसक्याही गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.

अभिजीत घोरमारे

चोरीच्या 12 मोटरसाइकल सह 4 लाख 40 हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे.चोरीच्या वाहनांसोबतच ती चोरणाऱ्यां आरोपींच्या मुसक्याही गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.Police succeed in finding stolen vehicles

गोंदिया शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकांनाहून चोरल्या गेलेल्या 12 दुचाकी शोधण्यात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला (Local crime branch) यश आलं आहे. तसेच या पथकाने या बारा गाड्यांसोबतच 4 लाख 40 हजारांचा मुद्देमालही या चोरांकडून हस्तगत केला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटकही करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

प्रशांत कोहळे वय (32), निशांत खरोले वय (24) असे अटक करण्यात आलेल्यां आरोपीचे नावे आहेत.गोंदिया शहर व जिल्हाच्या इतर भागातून गेले अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते तशा प्रकारच्या अनेक तक्रारीही गोंदिया शहर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाल्या होत्या. अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्यावरती गोंदिया पोलिस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला हे प्रकरण सुपर्द केले.

दरम्यान गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी प्रशांत कोहळे याच्यावरती पाळत ठेवून त्याच्याकडे चोरिच्या दुचाकी असल्याची गुप्त माहिती मिळवली. माहीती मिळताच प्रशांच कोहळीला या पथकाने शिताफिने ताब्यात घेतले.

दरम्यान आरोपी प्रशांतने त्यांने त्याचा सहकारी निशांत खरोले सोबत बाई गंगाबाई रुग्णालयाच्या मागील भागातुन व जिल्ह्याच्या इतर काही भागातुन दुचाकी चोरल्या असल्याची कबूली दिली. त्यांच्या कबूली नंतर उर्वरीत तपासामध्ये त्या दोन आरोपींकडून 4 लाख 40 हजारांच्या मुद्देमालासह 12 दुचाकी जप्त केल्या आहेत.

तसेच या पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेक नागरिकांच्या चोरीला गेलेल्या दुचाकी त्यांना प्राप्त होणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT