Jalna Crime लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

लव्ह सेक्स आणि धोका; लग्नाचे आमिष दाखवत पोलिसाचा तरुणीवर बलात्कार

जालन्यात चक्क पोलिस (Police) कर्मचाऱ्यानेच महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणी सोबत तब्बल ३ वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

लक्ष्मण सोळुंके

जालना: लव्ह सेक्स आणि धोक्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असेल. मात्र, जालन्यात चक्क पोलिस (Police) कर्मचाऱ्यानेच महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणी सोबत तब्बल ३ वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे, तर या पोलीस कर्मचाऱ्याने महिला कर्मचारी असलेल्या प्रियशीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत बलात्कार (sexual assualt) करत दुसऱ्या तरुणीसोबत घरोबा केल्याचा प्रकार समोर आल्याने कायद्याचे रक्षक असणाऱ्या खाकितील जवानामध्येच लव्ह सेक्स आणि धोक्याचा प्रकार जालन्यात (Jalna) उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

जालना जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या पोलिस (Police) कर्मचारी असलेल्या महिलेला पुणे राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असलेल्या पंकज मगर या आरोपी पोलीस जवानाणे प्रेमाच्या (love) जाळ्यात ओढून तिच्याशी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मूळचा वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या पंकज आणि पीडित महिला पोलिस कर्मचारी हे दोघेही वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवाशी आहे.औरंगाबादमधील एका भर्ती पूर्व प्रशिक्षण संस्थेत महिला कर्मचारी प्रशिक्षण घेत असताना दोघात ओळख झाली असताना ओळखीचं रूपांतर मैत्रीत (Friendship) झाले होते.

भर्तीपूर्व प्रशिक्षण केंद्रात झालेल्या मैत्रीतून दोघांच्या भेटी हळूहळू वाढू लागल्याने दोघांच्या मैत्रीचं रूपांतर अखेर प्रेमात झाले होते. प्रशिक्षण सुरू असताना पीडित महिला ही जालना जिल्हा कारागृहात पोलिस कर्मचारी म्हणून रुजू झाली. त्यानंतर आरोपी पंकज ही पुणे येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या बल गट क्रमांक दोनमध्ये रुजू झाला. त्यानंतर आरोपी पंकज ने लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणी सोबत तिच्या शासकीय निवास्थानात जाऊन तिच्यावर २०१८ ते २०२२ पर्यंत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केले आहे.

दरम्यान पीडित महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणींनी लग्नाचा तगादा लावला असता पंकज हा वारंवार टाळाटाळ करत होता. पंकज यांच्यावर संशय आल्याने पीडित पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणींनी त्यांची चौकशी केली असता. पंकज मगर याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत डिसेंबर २०२१ मध्येच एका दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आल्यानंतर या महिला पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणींनी पोलिसात धाव घेत पंकज विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पिडीतीच्या तक्रारीवरून तालुका पोलिसानी पोलिस ठाण्यात पंकज मगर यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी ऍक्ट, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वडते हे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT