nagpur crime news  saam tv
महाराष्ट्र

Nagpur : तुरुंग आहे की हॉटेल? कारागृहाबाहेरील वस्तू कैद्यांना आणून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बनवलंय रेट कार्ड

नागपुरातील कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी तुरुंगात पैसे घेऊन वस्तू पुरविण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मंगेश मोहिते

Nagpur crime News : नागपुरातील कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी तुरुंगात पैसे घेऊन वस्तू पुरविण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर कारागृह हे तुरुंग आहे की हॉटेल ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

नागपूर (Nagpur) मध्यवर्ती कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याच्या या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये कारागृहातील दोन कर्मचारी समाविष्ट होते त्यांच्यासह कैद्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

अजिंक्य राठोड व प्रशांत राठोड अशी कर्मचाऱ्यांची नावे असून निलेश वासनिक , वैभव दांडेकर, श्रीकांत थोरात, गोपाळ पराते व राहुल मेंढेकर हे कैदी या रॅकेटमध्ये सहभागी होते. मागील दोन वर्षापासून हे कैदी तुरुंगात आहेत. या कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कैद्यांसाठी बाहेरून गांजा खाद्यपदार्थ कपडे पैसे आणायला सांगायचे.

कारागृहातील हे कर्मचारी काही दिवसा अगोदर सुटका झालेल्या गुन्हेगार श्रीकांत गोपाल व राहुल यांना संबंधित सामान आणायला सांगायचे. या सगळ्या सामानांचे किती पैसे द्यायचे, त्याच एक रेट कार्ड देखील तयार करण्यात आले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रेट कार्डमध्ये पाच हजारापासून 25 हजारापर्यंत पैसे चार्ज केले जायचे. या धक्कादायक प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

SCROLL FOR NEXT