गावठी हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचे छापे; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त!
गावठी हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचे छापे; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

गावठी हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचे छापे; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त!

लक्ष्मण सोळुंके

जालना : शहरातील कैकाडी मोहल्ला व नूतन वसाहत भागात गावटी दारूच्या हातभट्टीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळाली होती. विनायक देशमुख यांनी अवैधरित्या चालणाऱ्या या हातभट्टी वर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

हे देखील पहा :

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत परिसरात एकाच वेळी सहा ठिकाणी छापेमारी केली असता या परिसरात काही इसम आणि महिला हा अवैधरित्या व्यवसाय करीत असल्याचे निरदर्शनास येताच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून सिमेंटच्या हौदामध्ये, लोखंडी ड्रम व प्लास्टिकच्या ड्रम मध्ये सोडलेला गुळ मिश्रीत रसायन व गावठी दारूसाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा वापर करून भट्टी लावुन दारु तयार करून चोरटी विक्री करताना आढळुन आले.

पोलिसांनी हा दारूचा अड्डा उद्धवस्त करत, आरोपींकडून 6 लाख 85 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कदीम जालना ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT