सुसाईड नोट व्हाट्सअ‍ॅपवर शेअर करून पोलीस कर्मचारी बेपत्ता !  SaamTv
महाराष्ट्र

सुसाईड नोट व्हाट्सअ‍ॅपवर शेअर करून पोलीस कर्मचारी बेपत्ता !

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं या पोलीस कर्मचाऱ्यानं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहिली असून ही सुसाईड नोट व्हॉट्सअ‍ॅप वर पोस्ट केल्याची माहिती समोर आली आहे. Police personnel go missing after sharing suicide note on WhatsApp!

व्हॉट्सअ‍ॅपवर आत्महत्या नोट पोस्ट केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने आपला फोन बंद करुन तो बेपत्ता झाला आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं या पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या नोटमध्ये म्हटलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

जालना जिल्ह्यातील सेवली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या उखळी गावात गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची माहिती कोणी तरी दिली होती. त्यामुळे आरोपी आणि त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन या पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. इतकेच नाही तर त्याला धमकी सुद्धा दिली होती.

यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. आपण प्रभारी अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, अशी चिठ्ठी लिहून त्याने पोलीस ठाण्याच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केली. आणि त्यानंतर दुपारपासून मोबाइल बंद करून हा पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. आपल्या मरणास संबंधित प्रभारी अधिकारी, आरोपी पती-पत्नी जबादार राहणार असून, त्याची सर्व माहिती माझ्या पत्नीस द्यावी असे त्याने या नोटमध्ये नमूद केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT