Kolhapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jaysingpur Crime News : फिल्मी स्टाइल अपहरणाने काेल्हापुरात 'सत्या'ची चर्चा, ज्वेलर्सच्या मालकसह पुतण्याचा शाेध सुरु

शंकेश्वर ज्वेलर्सचे सीसीटीव्हीचे कॅमेरे तपासून काेल्हापूर पोलिसांनी पुढील तपासाची दिशा ठरवली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील सातव्या गल्लीतील शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल (वय 70) व त्यांचा पुतण्या यश जैन यांचे रविवारी रात्री नऊच्या सुमारास अपहरण झाले. या घटनेत अज्ञात पाच ते सहा जणांचा समावेश असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल व त्यांचा पुतण्या यश जैन हे दुकान बंद करुन घरी निघाले हाेते. गांधी चौकातून घरी जात असताना त्यांच्या घराजवळ असणाऱ्या गल्ली नंबर दोन येतील बोळ भागात अंधाराचा फायदा घेऊन चार चाकीत दबा धरून बसलेल्या पाच ते सहा युवकांनी त्यांचे वाहन अडवले.

पाेरवाल यांना जबरदस्तीने आपल्या चार चाकीत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला अपहरणकर्ते व पोरवल यांच्यात झटापट झाली. तरीही त्यांनी पोरवाल व त्यांच्या पुतण्याला जबरदस्तीने चार चाकीत घालून बोळ रस्त्याने सरळ गल्ली नंबर दोन येथील पेंढारी यांच्या घरापासून नवीन तयार करण्यात आलेल्या डीपी रस्त्याने सुसाट वेगाने निघून गेले.

विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी पोरवाल व त्यांचा पुतण्याचे वाहन देखील नेले. ही घटना संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांना सत्या या चित्रपटाप्रमाणे घटना घडल्याची चर्चा सुरु केली. गांधी चौक येथे असणारे शंकेश्वर ज्वेलर्स मधील ही सीसीटीव्हीचे कॅमेरे चेक करून काेल्हापूर पोलिसांनी पुढील तपासाची दिशा ठरवत तपासून केलेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अपात्र लाडक्या बहीणींचा लाभ पुन्हा सुरू होणार? E- KYC केंद्रांवर वाढली महिलांची गर्दी

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

SCROLL FOR NEXT