बच्चू कडू यांच्या स्टिंग आॅपरेशननंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये - अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

बच्चू कडुंचे स्टिंग ऑपरेशन; पोलीस ऍक्शन मोड वर तर एफडीआय झोपेत

पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेषांतर करून जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा विक्रीचा भांडाफोड केला होता. यानंतर पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून प्रतिबंधित गुटखा विक्री आणि साठवणूक करणाऱ्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे

अॅड. जयेश गावंडे

अकोला - पालकमंत्री बच्चू कडू Bacchu Kadu यांनी वेषांतर करून जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा Gutkha विक्रीचा भांडाफोड केला होता. यानंतर पोलिस Police अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून प्रतिबंधित गुटखा विक्री आणि साठवणूक करणाऱ्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन FDA विभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. Police in Akola on Action mode After Bacchu Kadu Sting Operation

विशेष म्हणजे, पालकमंत्री कडू यांनी यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात आमच्या विभागाचा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट नमूद केले आहे.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी २१ जून रोजी वेषांतर करून जिल्ह्यातील अकोला, पातूर, बार्शीटाकळी गुटखा खरेदी केला. तसेच त्यांनी रेशन दुकानातून विनाकार्ड राशन मिळविण्याचा प्रयत्न केला. प्रतिबंधित गुटखा त्यांना सहज मिळाला. त्यासोबतच गुटखा विक्रीसंदर्भात त्यांनी पोलिस आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

दरम्यान, यानंतर पोलिस विभागाकडून कारवाई करण्यास सुरु झाली. पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने प्रतिबंधित गुटख्यावर तेव्हापासून सतत कारवाई सुरू केली आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या विभागाचे अधिकारी कारवाईसाठी कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. Police in Akola on Action mode After Bacchu Kadu Sting Operation

अन्न व औषध प्रशासन विभागाची पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलखोल केल्यानंतर या विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर अकोला विभागातील अधिकारी यांचे गुटखा माफियांसोबत साटेलोटे असल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT