Fardapur Police News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: कर्तव्य बजावून घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Fardapur Police News: फर्दापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Satish Daud

Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फर्दापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सतीश नारायण हिवाळे (वय ३२) असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश हिवाळे सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. (Latest Marathi News)

बुधवारी सतीश यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. दरम्यान, दुपारी पोलीस वसाहतीत घरी आल्यानंतर सतीश यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

Tulsi Vivah Upay For Marriage: तुळशी विवाहच्या दिवशी करा सोपे उपाय, विवाह जुळतील

Rava Laddu Recipe: संध्याकाळी जोरदार भूक लागलीय, मग घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी रवा लाडू

'लोकशाही टिकवण्यासाठी एक व्हावं लागेल'; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

धुळ्यात बनावट नोटांसह एक जेरबंद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

SCROLL FOR NEXT