Police fir saam tv
महाराष्ट्र

जन्मदात्या आई-वडिलांना घराबाहेर काढलं, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

जन्मदात्या मात्या-पित्याचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना पोलिसांनी दणका दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर : जन्मदात्या मात्या-पित्याचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना पोलिसांनी (Police) दणका दिला आहे. अहमदनगरच्या केडगाव उपनगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घरात राहणाऱ्या दोन मुलांनी आणि त्यांच्या पत्नींनी आई-वडिलांना शिवीगाळ करून घराबाहेर काढले. त्यानंतर मुलांच्या आई-वडिलांनी (Parents) घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली. किशोर नारायण कार्ले, उषा किशोर कार्ले, रमेश नारायण कार्ले, कोमल रमेश कार्ले आणि संतोष ऊर्फ भाऊ संजय निवडुंगे अशी आरोपींची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव शाहूनगर येथे राहणारे कार्ले कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या घरातली आई-वडिलांना ९ ऑगस्टला घराबाहेर काढले होते. दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या पत्नींनी शिवीगाळ करून आई-वडिलांना बाहेर काढले. या धक्कादायक प्रकाराची पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संबंधित आरोपींवर गुन्हा (Police case) दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

SCROLL FOR NEXT