samruddhi mahamarg , police charged youth after viral video of mahamrityunjaya yantra installed on samruddhi mahamarg at accident place, buldhana saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News : डाॅ. दाभाेलकरांच्या मागणीनंतर स्वामी समर्थ भक्तावर गुन्हा दाखल, समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाही केला हाेता दावा (पाहा व्हिडिओ)

स्वामी समर्थ साधकांनी देखील या गोष्टीचा निषेध करणे आवश्यक आहे अशी अपेक्षा डाॅ. हमीद दाभाेलकर यांनी व्यक्त केली आहे.

Siddharth Latkar

- प्राची कुलकर्णी / संजय जाधव

Buldhana News : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी प्रणित मार्गाच्या वतीने भविष्यात समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघात होऊ नये यासाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करुन घटनास्थळी सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. या उपक्रमाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला. दरम्यान पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या एका युवकाच्या विराेधात सिंदखेड राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

समृद्धी महामार्गावर सातत्त्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. हा माहामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 950 हून अधिक छोटे मोठे अपघात झाले आहेत. परंतु सर्वाधिक अपघात हे बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महारार्गावर अपघाताच्या ठिकाणी स्वामी समर्थ भक्तांनी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करून सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचाही जप करण्यात आला.

दरम्यान एका युवकाचा व्हिडिओ समाज माध्यात पाेस्ट करुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक डाॅ. हमीद दाभाेलकर (Dr. Hamid Dabholkar) यांनी लोकांना फसवणे आणि ठकवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त केली हाेती.

डाॅ. दाभाेलकर म्हणाले गेल्या महिन्यात समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा इथे झालेल्या भीषण अपघातात अनेक लोकांचा जाळून मृत्यु झाला. त्या तिथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सिंदखेड राजा यांच्या मार्फत महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आले आहे आणि या मुळे आजूबाजूच्या पाच दहा किलोमीटर मध्ये अपघात होणार नाही तसेच अपघात झाला तर मृत्यू होणार नाही असा दावा तिथल्या स्वामी समर्थ सेवा केंद्र समन्वयक यांनी केला आहे.

दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्यामधून लोकांना फसवणे आणि ठकवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे बुलडाणा पोलीस अधीक्षकांनी या वर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे अशी अपेक्षा डाॅ. दाभाेलकरांनी व्यक्त केली.

स्वामी समर्थ साधकांनी देखील या गोष्टीचा निषेध करणे आवश्यक आहे. आपल्याला आधारभूत वाटणारी श्रद्धा असण्याचे स्वतंत्र आपली राज्य घटना आपल्याला देते पण आणि लोकांची फसवणूक करणा-या अंधश्रध्दांना विरोध करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे असेही डाॅ. दाभाेलकरांनी नमूद केले.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांकडून समृद्धी महामार्ग अपघातस्थळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या निलेश आढाव या तरुणाविरुद्ध सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या युवका (youth) विराेधात जादूटोणा व अनिष्ट रूढी परंपरा विरोधी कायद्याच्या कलम २ आणि ३ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT