sangli crime news Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : विटा - कऱ्हाड रस्त्यावरील 'त्या' प्रकरणात मांत्रिकासह तिघांवर गुन्हा दाखल

पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

विजय पाटील

Sangli News : अंधश्रध्देतून (superstition) सांगलीच्या (sangli) विटा - कऱ्हाड रस्त्यालगत (vita karad road) असलेल्या एका मोकळ्या जागेत बोकडाचा बळी देऊन त्याचे मुंडके, पाय व अन्य साहित्य ठेवणाऱ्या संशयित संजय जरग आणि मांत्रिक व त्याचे साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

16 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास (sangli) विटा क-हाड रस्त्यालगत राजेंद्र सोमू राठोड यांच्या मालकीच्या जमीन मोकळ्या जागेमध्ये एक बोकड कापून तेथे बोकडाचे मुंडके व दोन पाय ठेवले होते. त्याच्या शेजारी वर्तमानपत्रावर नारळ दामटा, तांदूळ, देशी दारूची बाटली, काजळाची डब्बी, लिप्स्टीकची डब्बी, गांजा, दवाखान्याची चिठ्ठी, लिंबू, हळद व कुंकू ठेवून तेथे पूजा केल्याचे भिंगारदेवे (फिर्यादी) यांच्या निदर्शनास आले होते.

चार वर्षांपूर्वी तेथे जरग याचा अपघात (accident) झाला होता. त्याला एका मांत्रिकाने अपघात झालेल्या ठिकाणी बोकडाचा बळी देऊन उतारा देण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार त्याने हा प्रकार केला होता. दरम्यान जरग याने राठोड यास याबाबत तुम्ही पोलिसांत तक्रार केली तर हात, पाय मोडुन टाकेन, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT