yavatmal crime news Saam Tv
महाराष्ट्र

बाबाजी दाते महिला सहकारी बँक : दहा कोटीच्या फसवणुक प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी बँकेच्या माजी उपाध्यक्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिबंधकांसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal News :

यवतमाळ जिल्ह्यातील बाबाजी दाते महिला बॅंकेच्या अवसायकासह पाच जणांवर पाेलिसांकडून गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. तारण ठेवलेली मालमत्ता कर्जमक्त करणे, डीडीआरवर संगनमताने फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे दहा कोटी रूपयांची सभासदांची फसवणूक झाल्याचा आराेप हाेत आहे. (Maharashtra News)

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक डबघाईत आली आहे. बँकेचा एनपीए वाढल्याने बँकेच्या व्यवहारावर आरबीआयने निर्बंध घातले आहेत. सोबतच इथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे.

या अवसायकानेच दहा कोटीच्या तारण मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेच्या माजी उपाध्यक्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिबंधकांसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुप जगताप, अतुल जगताप, साहेबराव जगताप, लक्ष्मण वरकट असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असल्याची माहिती पाेलिस ठाण्यातून मिळाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT