Bhaskar Jadhav News  Saam TV
महाराष्ट्र

Breaking : शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा

शिवसेनेच्या गोटात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेच्या गोटात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप सदस्य आणि राणे समर्थक सोहम काटे यांनी जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आज शिवसेना-ठाकरे गटाच्या मोर्चा काढल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली होती. (Police case filed against shivsena mla bhaskar jadhav)

शिवसेना आणि ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चानंतर माध्यमाशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी राणेंवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानहानी, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान, चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या दडपशाही विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: आला रे आला पाऊस आला! राज्यात पुढील ८ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

कतारमधील रास लाफान येथील कारखान्यात स्फोट: १३ कामगारांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश

बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेसेना आक्रमक, नांदेड विमानतळावर जोरदार घोषणाबाजी

सांगली-साताऱ्यात महायुतीची मतं फुटली?मविआला महायुतीच्या 99 मतदारांचा पाठिंबा

Maharashtra News Live Update: बीडमध्ये उद्यापासून शाळेची वेळ: सकाळी ८:०० ते दुपारी १२:३०

SCROLL FOR NEXT