Pune, Arrests, Nagpur, Bihar Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपुरातील नऊ लाख रुपयांच्या बॅग चाेरी प्रकरणी पुण्यातून दाेघांना अटक

पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केला.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : भरदिवसा नऊ लाख रुपयांच्या पैश्याची बॅग लुटून नेण्याचा प्रकार नागपूर (nagpur) शहरात घडला हाेता. लकडगंज पाेलिसांनी (Lakadganj Police Station) घटनेचा कसून तपास करुन चार जणांना अटक (arrests) केली आहे. संशयितांकडून एक लाख रुपये हस्तगत करण्यात पाेलिसांना यश आले आहे. (Maharashtra News)

छापरूनगर भागात असलेल्या एका बँकेतून (bank) कोळसा व्यापाराच्या कर्मचाऱ्यांने पैसे काढले हाेते. या पैशांची बॅग त्याने दुचाकीवर ठेवली हाेती. दरम्यानच्या काळात त्याच्या पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीधारकांनी त्याला लाथ मारून खाली पाडत त्याच्याकडील पैसे लुटून पाेबारा केला हाेता.

पोलिसांनी बॅंक परिसरात तीन दिवस सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले. त्यानंतर त्यांना चाेरट्यांचा सुगावा लागला. संशयित आराेपी हे हैद्राबाद परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक लाखाची बॅग पळविल्याचे पोलिसांना कळलं. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला असता संशयित पुण्यात आढळून आले. पाेलिसांनी संशयितांना अटक केली. हे संशयित आराेपी बिहार राज्यातील आहेत. त्यांच्याकडून एक लाख रुपये हस्तगत केल्याची माहिती (महेश सागणे , पीआय, गुन्हे शाखा युनिट 3) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood pressure medication: रक्तदाबाची औषधं रोज घेऊनही बीपी नियंत्रणात येत नाही? डॉक्टरांनी सांगितलेली 'ही' ५ कारणं जाणून घ्या

Maharashtra News Live Update: बीड- विलास घुले खूनप्रकरणी एसआयटीच्या तपासाचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे

डायबिटीजच्या रूग्णांसाठी सर्वात सोपा उपाय, रोज न चुकता प्या मेथीच्या पानांचा रस, जाणून घ्या फायदे

देशातील 4 कोट्याधीश मुख्यमंत्री, कोणत्या राज्याच्या CM पहिल्या क्रमांकावर? थलपती विजयची संपत्ती किती? आकडेवारी आली समोर

Crime : कोल्हापूर हादरले! माजी महिला सरपंचाचा खून, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियकराला बेड्या

SCROLL FOR NEXT