satara, santosh (bhau) jadhav, satara crime news saam tv
महाराष्ट्र

Satara News : युवा नेते भाऊ जाधव हल्लाप्रकरणी युवकास अटक, माहूलीत कडकडीत बंद

या घटनेचा निषेध म्हणून आज माहूली ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले हाेते.

Siddharth Latkar

Satara Crime News : सातारा शहरातील युवा नेता संताेष (भाऊ) जाधव (bhau jadhav) यांच्यावर झालेल्या खूनी हल्लाप्रकरणी पाेलिसांनी क्षेत्रमाहूली येथील एकास अटक केली आहे. दरम्यान भाऊंची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसातच ते सर्वांसोबत पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करतील अशी माहिती संतोष भाऊ जाधव युवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे (Maharashtra News)

युवा नेते संताेष जाधव यांच्यावर मंगळवारी जीवघेणा हल्ला झाला. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक बापू बांगर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बोहरे व पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले.

या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी हा मसूर फाटा येथे शेतात असल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांच्या पथकाने संशयिताचा माग काढत त्यास मसूर फाटा येथील शेतातून ताब्यात घेतले.

त्यानंतर पथकाने संशयितास सातारा शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. या गुन्ह्यातील संशयित आरोपीस 12 तासाच्या आत जेरबंद केल्याने एसपी समीर शेख ,पोलिस उपाधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, राकेश खांडके, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, मोहन पवार, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, अमृत कर्पे यांनी केली.

भाऊंची प्रकृती स्थिर

दरम्यान सुसंस्कृत, निर्व्यसनी, समाजकारणात व्यस्त असणारे, प्रत्येक मित्राच्या मदतीला धावून जाणारे संतोष भाऊ जाधव यांच्यावर काही समाजविघातक वृत्तीच्या दोन इसमांनी प्राणघातक असा हल्ला केला.

सुदैवाने भाऊ यातून सुखरूप वाचले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसातच भाऊ आपल्या सर्वांसोबत पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करणार आहेत. अशा प्रवृत्तीच्या विरोधात भाऊ नेहमीच आपला आवाज उठवत होते व उठवणार आहेत असे कितीही भ्याड हल्ले झाले तरी भाऊंना समर्थ कृपेने काहीच होणार नाही.

हल्लेखाेरांवर कठाेर कारवाई व्हावी

अशा षंडवृत्तीच्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. प्रशासनाने अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी अन्यथा संतोष भाऊ जाधव युवा प्रतिष्ठान अशा लोकांना योग्य असा धडा शिकवेल असे पत्रक जाधव समर्थकांनी काढले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT