pandharpur, police, arrests, youth Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur : गावठी कट्ट्यांसह दाेघांना अटक, पंढरपूर शहर पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघड

पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केला.

भारत नागणे

Pandharpur : मिर्झापूर वेब सिरीज पाहून भाईगिरी करण्यासाठी देशी गावठी कट्टे बाळगणा-या दोघा संशयितांच्या पंढरपूर शहर पोलिसांनी (pandharpur city police) मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पंढरपुरातील धनाजी सिध्देश्वर आटकळे व उत्तर प्रदेशातील सहजराम मताऊ वर्मा याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी ‌विक्रम कदम यांनी दिली.

ही कारवाई पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगणात करण्यात आली. एक इसम अंबाबाई पटांगण परिसरात अंधारात पिस्तुल सारखे हत्यार घेवून उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखचे प्रमुख चिमणाजी केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला पकडून त्याची झडती घेतली. (Maharashtra News)

त्यांच्याकडे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता घरात लपवून ठेवलेला आणखी एक देशी बनावटीचा गावठी कट्टा काढून दिला. दोन्ही गावठी कट्टे मुळच्या उत्तर प्रदेशातील व सध्या पंढरपुरात राहत असलेल्या वर्मा नावाच्या साथीदाराकडून घेतल्याचे सांगितले.

संशयित धनाजी अटकळे याने मिर्झापूर ही वेबसीरीज पाहिली होती. त्यामध्ये दाखवण्यात आलेले गावठी कट्टे आपल्याकडे ही असावेत असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो गावठी कट्ट्याच्या शोधात होता. उत्तर प्रदेशातील सहजराम वर्मा याच्याशी त्याची भेट झाली. त्यानंतर वर्मा याने आटकळे याला दोन गावठी कट्टे विकल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आली आहे. भाईगिरी करण्यासाठी तो गावठी कट्टे सोबत बाळगत होता अशी माहिती विक्रम कदम उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्गात ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने मुस्लिम शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण|VIDEO

हनीमूनला गेल्यावर रूमची लगेच लाईट लावता? 'ही' चूक पडेल महागात? तज्ज्ञ काय सांगतात?

Chakli Tips: घरी असलेल्या चकल्या मऊ झाल्यात? या सोप्या टिप्सने पुन्हा होतील कुरकुरीत आणि खुसखुशीत

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

Kharik Khobra Laddu: हिवाळ्यात बनवा खारीक-खोबऱ्याचे पौष्टिक लाडू, महिनाभर टिकतील

SCROLL FOR NEXT