crime news , amravati, chandur railway SaamTv
महाराष्ट्र

Chandur Railway : गुंड नईम खानचा रात्री झाला गेम; पाेलिसांनी धरला दाेघांवर नेम

24 तासांत खानला अटक करुन मुलीला घरी आणावे अशी मागणी नागरिकांनी पाेलिसांपुढे ठेवली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Chandur Railway Breaking News : चांदूर रेल्वे येथील गुंड नईम खान खून प्रकरणात दोन जणांना पाेलिसांनी (police) ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दाेघांची पाेलिस कसून तपास करीत आहे. आज सकाळी खान याच्या खूनाची बातमी शहरात तसेच अमरावती जिल्ह्यात वा-या सारखी पसरली हाेती.

गुंड नईम खान हा चांदूर रेल्वे शहरातील गारुडी पुरा, शिवाजीनगरसह अनेकांची डोकेदुखी ठरत होता. अनेक बेकायदेशीर कामे त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांकडुन केली जात असे. काहींची पाेलिसांत नाेंद हाेत असे काही जण घाबरुन पाेलीसांत जात नसे.

तीन दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलीला त्याने धमकावून घरातून पळवून नेले हाेते. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी पाेलिस ठाण्याला घेरलं हाेते. 24 तासांत खानला अटक करुन मुलीला घरी आणावे अशी मागणी नागरिकांनी पाेलिसांपुढे ठेवली हाेती.

त्यानंतर मध्यरात्री नईम खानचा खून झाला. हा खून काेणी केला असेल याची चर्चा आज सकाळपासून शहरात सुरु हाेती. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास खानच्या खून प्रकरणात पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेतल्याची माहिती समाेर आली. या दाेघांची चाैकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नंदुरबार जिल्ह्याला रेड अलर्ट नंतर तापी नदीला पूर

अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; भेटीगाठी घेत असतानाच घाईघाईनं घरात गेले, तातडीने डॉक्टर पोहोचले

Pune News: रॅगिंगला कंटाळला, १४ दिवसांपासून MBBS चा विद्यार्थी बेपत्ता; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील प्रकार

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या रूपाची चर्चा, सौंदर्याने सर्वांनाच केलं थक्क

Shagun Sharma: 'सेटवर त्याने खूप त्रास दिला'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौरव खन्नावर गंभीर आरोप, म्हणाली, 'तो सतत अपमान...'

SCROLL FOR NEXT