sangli, lcb, koregoan, phaltan saam tv
महाराष्ट्र

Sangli : आष्टा पोलिसांची माेठी कामगिरी; कोरेगाव, पुसेगाव, फलटणसह हडपसर, जेजुरीतील 17 दुचाकी हस्तगत, तिघांना अटक

गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आष्टासह अन्न जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकींची चोरी करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील तिघा सराईतांना आष्टा पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल 17 दुचाकीसह सात लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

नामदेव बबन चुनाडे, महादेव भोसले, गणेश भोसले हे सर्व राहणार सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या तिघांनी आष्टा, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगाव, पुसेगाव आणि फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आष्टा येथील अप्पर तहसिल कार्यालया जवळील संजय भानुसे यांचे दुचाकी घरात जवळून चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी फिर्याद दिली होती. आष्टा पोलिसांनी गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.

एक संशयित आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील सांगली (sangli) इस्लामपूर रस्त्यालगत एका दुचाकीवरून संशयितरित्या वावरत होता. त्याची खात्री करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली.

त्याच्याकडून गुन्हे उघडकीस आले. गेल्या काही दिवसात आष्टासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन आष्टा पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT