Hingoli, Fake Currency
Hingoli, Fake Currency saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : दहा लाखाच्या खऱ्या नाेटा देऊन खरेदी केल्या काेटयावधीच्या बनावट नाेटा; जाणून घ्या प्रकरण

संदीप नागरे

Hingoli News : हिंगोली (hingoli) जिल्ह्यात पाेलिसांनी (police) तब्बल एक कोटी चौदा लाख रुपयांच्या बनावट नोटा (fake currency) जप्त केल्या आहेत. औंढा पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. या प्रकरणी दहा संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

औंढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलिसांचे पथक शहरात गस्त घालत हाेते. त्यावेळी या पथकास संशयास्पद गाेष्टी निदर्शनास आल्याने त्यांनी संशयितांची अधिक चाैकशी केली असता त्यांना सांगितलेल्या माहितीत (information) तफावत आढळली.

या प्रकरणी पाेलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. चाैकशीअंती पाेलिसांनी सर्वांना अटक (arrest) केली. त्यांच्याकडून एक कोटी चौदा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. संशयितांनी पाच ते दहा लाख रुपयांच्या खऱ्या नोटा देऊन बनावट नोटा खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान अटकेतील संशयित आरोपी हे विदर्भासह मराठवाड्यातील आहेत. या प्रकरणात आणखी मोठी माहिती उघड होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : करवीर निवासिनी अंबाबाईला खास आंब्याची आरास

Arvind Kejriwal bail: अरविंद केजरीवालांना जामीन मिळाला, पण सुप्रीम कोर्टानं घातल्या ५ महत्वाच्या अटी

Maharashtra Rain : ऋतू फिरला!... उन्हाळ्यात पावसाळ्यासारख्या धुवाधार बरसला; पुण्यात रस्ते तुडुंब, अर्ध्या महाराष्ट्राला 'अवकाळी' तडाखा

Shivali Parab : मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली शिवानी ते कल्याणची चुलबुली

Gujrat News: लेकासाठी ४० लाखाचं कर्ज काढलं; परदेशात जाताच मुलाने नात तोडलं, माता- पित्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT