Shri Sant Balumama Mandir, Solapur, Kolhapur Saam Tv
महाराष्ट्र

Shri Sant Balumama Mandir : श्री संत बाळूमामा मंदिर परिसरातून बाळाचे अपहरण करणा-या दाेघांना जावळ्यात अटक

ही कारवाई पाेलिसांनी तात्काळ केल्याने चिमुकल्याची त्याच्या पालकांशी भेट हाेणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : भुदरगड (जि. कोल्हापुर) तालुक्यातील आदमापुर येथील श्रीसंत बाळूमामा मंदीर (shri sant balumama mandir adampur) येथून एका चिमुकल्याचे अपहरण झाले हाेते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली हाेती. पाेलिसांनी (police) अवघ्या 48 तासांत घटनेचा तपास करुन चिमुकल्याची सुटका केली आहे. (Breaking Marathi News)

चिमुकल्याचे अपहरण झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या वाहन क्रमांकासह अपहरणकर्त्यांचे छायाचित्र समाज माध्यमातून व्हायरल झाला. तसेच याबाबत काेणाला काही मिळाली मिळाल्यास त्यांनी तात्काळ भुदरगड पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन पाेलिसांनी केले हाेते.

दरम्यान 48 तासातच पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक केली आहे. ही कारवाई सोलापूर जिल्ह्यातील जावळा गावात पाेलिसांनी केली आहे. पालेिसांनी संशयित आरोपी मोहन शितोळे आणि त्याची पत्नी या दाेघांना अटक केली आहे. स्वतःला मूल नसल्याने संबंधित सहा वर्षाच्या मुलाला त्यांनी चाेरल्याची कबुली दिल्याची माहिती पाेलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT