BJP Yuva Morcha Leader Pappu Chavan, Hingoli News  saam tv
महाराष्ट्र

BJP Pappu Chavan Case : भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक

संदीप नागरे

Hingoli Crime News : भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण (hingoli bjp yuva morcha president pappu chavan) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात हिंगाेली पाेलिसांनी एका आठवड्यात पाच संशयितांना अटक केली आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

या हल्ल्याबाबत भाजपचे पप्पू चव्हाण यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला. त्यात या हल्ल्याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगर, नगरसेवक राम कदम, शाम कदम यांच्यावर ठपका ठेवला गेला. या घटनेची सीआयडी चाैकशी व्हावी अशी मागणी पप्पू चव्हाण यांनी केली आहे.

मध्यरात्री दाेघांना घेतले ताब्यात

या घटनेतील संशयितांना शाेधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकाच्या मार्फत जलद गतीने तपास केला. या प्रकरणात यापुर्वी तिघांना अटक करण्यात आली हाेती. हिंगोली पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री उशिरा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अक्षय इंदूरिया व ओम पवार या दोघांना ताब्यात घेतले. आतापर्यंत एकूण या प्रकरणांमध्ये पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पाेलिसांचा कसून तपास सुरु

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अटक करण्यात आलेल्यांमध्ये अक्षय इंदूरिया, ओम पवार, सत्यम देशमुख, अजिंक्य नाईक व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. राजकीय व्यक्ती व स्थानिक आमदारांची या प्रकरणात नावे पुढे येत असल्याने प्रकरणाच गांभीर्य वाढलं आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT