Rickshaw , chhatrapati sambhaji nagar news  Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : बंटी बबलीच्या कारनाम्याने पाेलिसही चक्रावले, तुमच्यासाेबत रिक्षात असा प्रकार घडला? जरुर तक्रार नाेंदवा

chhatrapati sambhaji nagar crime news :

Siddharth Latkar

- नवनीत तापडीया

Crime News : रिक्षातील प्रवाशांसोबत लगट करून त्यांनीच छेडल्याचा कांगावा करत आत्तापर्यंत सुमारे नागरिकांना लुटणा-या बंटी बबलीला छत्रपती संभाजीनगर पाेलिसांना (chhatrapati sambhaji nagar police) जेरबंद करण्यात यश आले आहे. सुनील लक्ष्मण श्रीखंडे आणि कविता सुनील रगडे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असल्याचे पाेलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.(Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शहरातील मध्यवर्ती स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या प्रवाशाला दमदाटी करून त्याचा मोबाईल हिसकवल्याची घटना घडली होती. या घटनेची तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता श्रीखंडे आणि रगडे यांचे कारनामे उघडकीस झाले. रिक्षातील प्रवाशांसोबत लगट करून छेडल्याचा कांगावा करुन हे दोघे प्रवाशांची लूटमार करायचे. प्रवासी बदनामीच्या भीतीने पाेलिसांत तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.

पती-पत्नी सारखे राहत

संशयित दाेघांचे लग्न झालेले नसून ते पती-पत्नी सारखे राहत असत अशी माहिती पाेलिसांनी दिली. प्रवासी एकटा असल्याचे पाहून ते त्याला रिक्षात बसवून घेत. त्यानंतर महिलेची छेड काढल्याचा कांगावा करीत. प्रवाशांकडून मोबाइल, पैसे काढून घेतले जात असे तपासात उघड झाले आहे.

तक्रार असल्यास जरुर नाेंदवा

सुनील लक्ष्मण श्रीखंडे (४०, रा. गल्ली क्र. ६, नवनाथनगर, गारखेडा) आणि कविता सुनील रगडे (३४, रा. नवनाथनगर) अशी संशियतांची नावे असून रिक्षा क्रमांक एमएच २० ईएफ १२०८ जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान असा प्रकार काेणाबाबत घडला असल्यास जरुर नजीकच्या पाेलिस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन पाेलिसांनी (police) केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT