Solapur, arrest Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : आईचं वर्षश्राद्ध; पाचशे रुपयांवरुन भावानं काढला भावाचा काटा, चाैघे अटकेत

या घटनेमुळे सोलापुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News : आईच्या (mother) वर्षश्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक होती. ही उधारी देण्यासाठी मोठं भाऊ (brother) आणि छोट्या भावामध्ये वादविवाद झाला आणि मोठ्या भावाने छोट्या भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथील पिंजारवाडीत घडली आहे. मोठ्या भावाने छोट्या भावास दगड, सळईने मारहाण केली. त्यात छाेट्या भावाचा मृत्यू झाला अशी माहिती तपासात निष्पन्न झाल्याचे अतुल भोसले (पोलीस निरीक्षक,वळसंग) यांनी सांगितले.

भावाने भावाचा खून केल्याची घटना माहित होताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. सैफन घूडूसाब नदाफ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मीरालाल घुडूसाब नदाफ,सलीम मीरालाल नदाफ,रफिक मीरालाल नदाफ,नियामतबी मीरालाल नदाफ यांना अटक केली आहे. आईचे श्राद्ध करण्यासाठी केलेल्या खर्चावरून फक्त पाचशे रुपयांसाठी मोठ्या भावाने छोट्या भावाचा खून केल्यामुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

एक वर्षांपूर्वी मीरालाल आणि सैफन यांच्या आईचे निधन झाले होते. या दोघां भावांनी एकत्रितरित्या आईचे श्राद्ध करून गोरगरिबांना अन्नदान केले होते. यावेळी गावातील एका मशिदीत असलेल्या मंगल भांडारमधून भांडे भाड्याने घेतले होती. या मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक राहिली होती. ही उधारी मागण्यासाठी मशिदीचे विश्वस्त जमादार सैफन नदाफ यांच्या घरी गेले होते. पण हि रक्कम मीरालाल नदाफ यांच्याकडून घ्या असे सैफन नदाफ यांनी सांगितले होते.

सैफन नदाफ यांनी मंगल भांडार वाल्या जमादार या व्यक्तीला सांगितले होते की,पाचशे रुपये मीरालाल नदाफ यांकडून घ्या. त्यांनी नाही दिले तर मी देतो. मीरालाल नदाफ यांनी मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी दिली पण यावरून दोघा भावांत वितुष्ट निर्माण झाले आणि वादविवाद झाला.

मीरालाल नदाफ यांनी पाचशे रुपये उधारी देऊन जमादार यांना पाठविले. पण छोटा भाऊ सैफन नदाफ याविरोधात कट रचला. पाचशे रुपयांवरून मीरालाल नदाफ हा छोटा भाऊ सैफन नदाफ यावर चिडून होता. सैफन नदाफ हा शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. त्यावेळी सैफन हा एकटा असल्याची संधी साधून मीरालाल नदाफ यांनी पाचशे रुपयांसाठी कर्जदारांना माझ्या घरी पाठवतो का असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मीरालाल यांचा मुलगा रफिक नदाफ याने पाठीमागून येऊन सैफन नदाफ यांचे हातपाय पकडले मीरालाल नदाफ यांनी दगडाने,सळईने छोटा भाऊ सैफन नदाफ यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली.

मीरालाल नदाफ यांची पत्नी,नियामतबी नदाफ,दुसरा मुलगा सलीम नदाफ यांनी सैफन नदाफ यांच्या डोक्यावर आणि सर्वांगास जबर मारहाण केली. दरम्यान,शहनाज नदाफ यांनी उपचारासाठी पती सैफन यांस सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण डोक्याला गंभीर इजा झाल्याने जखमी उपचारास प्रतिसाद देत नव्हता. अखेर सैफन यांची प्राणज्योत मालवली. मृत झाल्याची माहिती मिळताच पिंजारवाडीतील ग्रामस्थांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती. फक्त पाचशे रुपयांसाठी भावाने भावाला संपविले अशी चर्चा करत ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

Kerala CM Oath Ceremoney : मोठी बातमी! केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन, दिग्ग्ज नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ

Cannes Festival-Ashok Saraf : 'कान्स'मध्ये मराठीचा डंका! अशोक मामांनी केली हटके एन्ट्री, निवेदिता सराफ यांच्या लूकने वेधले लक्ष | VIDEO

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT