कारागृहाची भिंत ओलांडून सिनेस्टाईल फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या   भूषण अहिरे
महाराष्ट्र

कारागृहाची भिंत ओलांडून सिनेस्टाईल फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

धुळे जिल्हा कारागृहातुन दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कारागृहाची भिंत ओलांडून सिनेस्टाईल पद्धतीने कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्हा कारागृहातुन दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कारागृहाची भिंत ओलांडून सिनेस्टाईल पद्धतीने कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सदर घडलेल्या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासातच फरार कैद्याच्या देवपूरातून मुसक्या आवळल्या आहेत. Police arrested the escaped prisoner

हे देखील पहा -

पोस्को कायद्यांतर्गत कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी अर्जुन रंगनाथ आव्हाड रा. आंबेडकर नगर, नकाने रोड धुळे असे फरार झालेल्या कैद्याचे नाव असून दुपारच्या सुमारास कारागृहात कोरोना प्रतिबंधक लसीकरनाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात सर्व अधिकारी आणि पोलीस गुंतले होते नेमक्या याच संधीचा फायदा घेत हा कैदी कारागृहाच्या भिंत ओलांडून फरार झाला होता.

आरोपी फरार झाल्याने कारागृह पोलिसांनी कारागृहाच्या परिसरात शोध मोहीम राबविली. मात्र कैदी सापडून न आल्याने कारागृह पोलिसांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत देवपूरातून काही तासातच आरोपीला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्याने शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT