parbhani , Crime News saam tv
महाराष्ट्र

Parbhani Crime News : मुनिमाची कार रस्त्यात अडवून लुटले ४ लाख; मयुर मोरेस अटक

या प्रकरणी पाेलिस आणखी एकाचा शाेध घेताहेत.

राजेश काटकर

परभणी : व्यापाऱ्याची उधारीची रक्कम वसुली करून परतणाऱ्या मुनीम आणि वॉचमन यांची कार (Car) रस्त्यात दुचाकी (two wheleer) आडवी लावून थांबवत चार लाखांची रक्कम लुटल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला असून मुनीम आणि वॉचमन ज्या कारमध्ये होते त्याच्या चालकानेच हा लुटीचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी (police) चालकाला ताब्यात घेऊन रक्कम जप्त केली आहे (Parbhani Crime News)

परळी येथील व्यापारी विष्णू देवसटवार यांचा मुनीम व वॉचमन हे गंगाखेड येथे कारने (एम एच 44 झेड 6544) वसुलीसाठी आले होते. चार लाखांची रक्कम वसूल करून गंगाखेडहून मुनीम वॉचमनसह परळीकडे परतत होते. दरम्यान, गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटी येथे कारच्या समोर अचानक एक दुचाकी आडवी लावण्यात आली.

यानंतर दुचाकीवरील दोघांनी कारमधील मुनीम व वॉचमनला मारहाण केली. त्यांच्याजवळील ४ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेऊन दोघे दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी विष्णू देवसटवार यांच्या तक्रारीवरुन सोनपेठ पोलीसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केला हाेता.

या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करुन कार चालक मयुर मोरे (राहणार मुंगी, ता. परळी) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पाेलिसांच्या चौकशीत मयूर मोरे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर माेरे यास पाेलिसांनी अटक करुन लुटलेले ४ लाख रुपये सचिन सोळंके याच्या घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी पाेलिस आणखी एकाचा शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी मिडियम' मालिकेतली अभिनेत्री आहे प्रसिद्ध इन्फ्ल्यूएन्सर! इन्स्टाग्रामवर आहेत मिलियन फॉलोअर्स

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

Navi Mumbai Airport: मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ५ मिनिटांत, काय आहे सरकारचा मास्टरप्लान?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा, कोणाचे कर्ज होणार माफ?

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' मराठीनंतर हिंदीतही १ नंबरवर! रितेश भाऊंनी रचला इतिहास, कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT