Chhatrapati Sambhaji Nagar, Phone Call, Chhatrapati Sambhaji Nagar Airport saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Airport News : बायकोशी भांडण झाल्याने त्याने पाेलिसांना चक्क दिली विमानतळ उडविण्याची माहिती; बीडीडीएसच्या पथकाची धावपळ

यापुर्वी कौटुंबिक वादातून मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याचे नुकतेच समाेर आले हाेते. आता थेट विमानतळ उडवण्याची धमकीने सगळेच हैराण झाले हाेते.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar : मांगिरबाबाच्या जत्रेला जात असताना गाडीतील चार व्यक्ती उद्या व परवा विमानतळावर (chhatrapati sambhaji nagar airport) बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करत होते अशी माहिती देणारा फोन छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांच्या (chhatrapati sambhaji nagar police) नियंत्रण कक्षाला आला. या फोनमुळे सर्व यंत्रणा सतर्क झाली. (Maharashtra News)

यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांसह (midc cidco police) बीडीडीएसच्या पथकाने विमानतळावर धाव घेतली. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर काहीच नसल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर फोन लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, त्याने बायको सोबत भांडण झाल्यामुळे असा फोन केल्यास पोलीस अटक करतील म्हणून चुकीची माहिती देणारा फोन केल्याचे सांगितले. कारभारी कडुबा रिठे असे खोटी माहिती देणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT