Crime News
Crime News 
महाराष्ट्र

मांडवीत रिसॉर्टमध्ये छमछम, छाप्यात १६ बारबालांसह ३१ अटकेत

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई-विरार ः वसई विरारमधील एका रिसॉर्टमध्ये बारबालांचा छमछम नाच सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विरार पोलीस ठाणे हद्दीतील मांडवी परिसरातील चांदीप येथील मॉस या रिसॉर्टमध्ये हे अवैध कृत्य सुरू होते.

मॉस रिसॉर्टवर गुरुवारी रात्री बारबालांचा छम-छम डान्स सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी रिसॉर्टवर छापा टाकला. यावेळी बारबालांचा छमछम नाच होत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १५ ग्राहक व १६ बारबालांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. आज शुक्रवारी या सर्व आरोपींना वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आहे. या छाप्यामध्ये 2 लाख 30 रोकड व विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे.

कोरोना काळात अवैधरित्या बारबालांचा नाच सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार तेथे छापा टाकला. १६ बारबाला व १५ पुरूषांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून काही रोकड रक्कम व विदेशी दारूही जप्त केली आहे.

- सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक ,विरार पोलीस ठाणे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : तुझे केस पाठीवरी मोकळे...

Shiv Sena UBT: खोटेपणा साप, बाळासाहेबांचा शाप..! Sanjay Raut नरेंद्र मोदींबाबत काय बोलून गेले?

Today's Marathi News Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दादर शिवाजी पार्कवर पोहोचणार

Pandharpur Vitthal Rukmini Temple News: पांडुरंगाच्या भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी!

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींनीच केला खुलासा

SCROLL FOR NEXT