मोगली एरंडीच्या बिया खाल्यामुळे पाच लहान मुलांना विषबाधा लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

मोगली एरंडीच्या बिया खाल्यामुळे पाच लहान मुलांना विषबाधा

विषबाधा झालेल्या पाच मुलांना उपचारासाठी जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : मोगली एरंडीच्या बिया खाल्यामुळे पाच लहान मुलांना विषबाधा झाल्याची घटना जालन्यात घडली आहे. विषबाधा झालेल्या पाच मुलांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील डहाळेगाव येथे ही घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बाहेर खेळत असलेल्या स्वरा अमोल जाधव वय अडीच वर्षे, अनुष्का अमोल जाधव वय सहा वर्षे, अनुष्का दिगंबर मस्के वय पाच वर्षे, रोषनी बाबासाहेब मस्के वय चार वर्षे आणि तेजस्विनी बाबासाहेब मस्के वय सहा वर्षे या लहान मुलांना एरंडीच्या बिया खाल्या.

थोड्याच वेळात त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाल्याने गावातील सरपंच भाऊराव धोंडीबा मुके यांनी तातडीने या पाचही लहानग्यांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून पाच ही मुलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT