PM Narendra Modi Latest News Saam TV
महाराष्ट्र

PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम...

Narendra Modi Yavatmal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. २८) पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून ते यवतमाळ येथील महिला बचत गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

Satish Daud

PM Narendra Modi Yavatmal Tour

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. २८) पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून ते यवतमाळ येथील महिला बचत गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहे.मोदींच्या स्वागतासाठी भाजपसह शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली जात असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. (Latest Marathi News)

यवतमाळ येथील कार्यक्रमात मोदी विविध विकासकामांचे उद्घाटन देखील करणार आहे. त्यानंतर पीएम किसान योजनेचा १६ व्या हप्त्याचे मोदींच्या हस्ते वितरण होणार आहे. दुपारी ४ वाजता मोदी यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथील मैदानावर सभा घेणार आहेत.

या सभेसाठी ४५ एकरवर मंडप उभारण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्वाचा समजला जात आहे. त्यामुळे मोदी आजच्या सभेत नेमकं काय बोलणार? कोणकोणत्या मोठ्या घोषणा करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा कसा असेल?

  • पंतप्रधान मोदी तामिळनाडू येथून दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील.

  • विमानतळावरून मोदी हेलिकॉप्टरने जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रीप हेलिपॅडकडे रवाना होतील व दुपारी ४.२५ वाजता तेथे पोहोचतील.

  • कडक बंदोबस्तात पंतप्रधान मोदींचा ताफा डोरलीकडे जाईल. पावणेसहा वाजेपर्यंत पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होईल.

  • यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

  • सोबतच पंतप्रधान ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सुमारे ३,८०० कोटी रुपयांचा दुसरा व तिसरा हप्तादेखील वितरित करतील.

  • याचा लाभ ८८ लाख शेतकऱ्यांना होईल. यानंतर पंतप्रधान मोदी हे उपस्थितांना संबोधित करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT